Share

आरएसएसकडून देशातील स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान यावरून राहुल गांधी यांनी कर्नाटक आमदारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर टीका केली. कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार आणि दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपामध्ये येण्यासाठी जनता दलाच्या (सेक्युलर) प्रत्येक आमदारासमोर 100 कोटी रूपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. ते आज छत्तीसगढमधील जाहीर सभेत बोलत होते. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी संघावर देखील निशाणा साधला सध्या देशाच्या राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे केवळ पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच घडू शकते, अशा शब्दांत त्यांनी संघावर निशाणा साधला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!