🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या सेंच्युरियन (Indian Cricket Team)कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने (lungingidi) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. लुंगी एनगिडीने म्हटले आहे की, जर आम्ही दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला 350 धावांच्या आत ऑल आऊट केले तर आम्ही या सामन्यात शानदार पुनरागमन करू शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली २७२/३ अशी धावसंख्या संघाने उभारली. शतक झळकावत केएल राहुल १२२ धावांवर नाबाद होता, तर अजिंक्य रहाणेही ४० धावा करून क्रीझवर होता.
सध्या दोन्ही भारतीय खेळाडू ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, ते पाहता सध्या भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी पुनरागमन करू शकेल, असा विश्वास लुंगी एनगिडीला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “हे कसोटी क्रिकेट आहे, काही सत्रात तुम्ही चांगली कामगिरी करता तर काही सत्रात खराब कामगिरी करता. एकूणच क्रिकेटसाठी हा दिवस खूप चांगला आहे. गोष्टी खूप लवकर बदलू शकतात.
लुंगी एनगिडीने 41व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. अशीच कामगिरी करून संघ पुनरागमन करू शकेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. “दोन चेंडूत दोन विकेट मिळाल्यास काहीही होऊ शकते. सकाळच्या सत्रात आम्ही विकेट्स घेण्यास यशस्वी झालो तर आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकतो. भारतीय संघाला 340-350 च्या आत रोखले तर आम्ही पुन्हा दमदार आगमन करू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
