🕒 1 min read
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची २५ डिसें.रोजी जयंती होती. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’सुरु केले आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले असून देणगीच्या पावत्या फाडल्याने देश खरंच बलाढ्य होईल का?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, राऊतांच्या या टीकेवर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’भाजपकडे सचिन वाजे वसूली यंत्रणा नसल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांकडून पावत्या फाडून अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब’, असे खोचक प्रत्युत्तर भातखळकरांनी दिले आहे.
भाजपकडे सचिन वाजे वसूली यंत्रणा नसल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांकडून पावत्या फाडून अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब. pic.twitter.com/IbYH0o6dI0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 27, 2021
दरम्यान, देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले . कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे , स्वातंत्र्यवीर , महात्मा गांधी , पंडित नेहरू , सरदार पटेल , इंदिरा गांधी , डॉ.आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढय़ होत जाईल , पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल . यामुळे देश आणखी बलाढय़ खरंच होईल ? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही’, असे राऊत लेखात म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
