🕒 1 min read
मुंबई: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी चंद्रपूर येथील राजुरा नगर परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. मात्र पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी पुतळ्याच्या भागावरच पाय दिला. यावरूनच आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वीच भाजपशासित कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून विटंबना करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपने वडेट्टीवार यांना निशाण्यावर धरले आहे.
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी वडेट्टीवार यांचा पुतळ्यावर पाय देतानाचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करत टीका केली आहे. महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याच्या भागावरच पाय ठेवला. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय ॲक्शन घेणार,वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? असा प्रश्न केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत केला आहे.
महाआघाडी सरकारमधील मंत्री @VijayWadettiwar यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला…@OfficeofUT काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? pic.twitter.com/Ire1qbJ798
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहे. कुठलाही भेद न करता त्यांनी सुराज्य निर्माण केले. देशाच्या स्वातंत्र्य, शौर्य व अस्मितेचे ते प्रतीक आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्यासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. मात्र यावेळी पुष्पहार अर्पण करतानाचा त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून भाजपने टीकासत्र सुरु केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर’, निलेश राणेंचा टोला
- कणकवलीत शिवसैनिकावर चाकू हल्ला प्रकरण; नितेश राणेंना अटक होणार?
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
