🕒 1 min read
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री उदय सामंत सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांनी संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असे म्हणत नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. सतीश सावंत ज्यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेत काम करत होते ते काय काय काम सांगत होते, हे सर्वांनाच ठाऊक असल्याचे म्हणत त्यांनी राणेंना टोला लगावला. आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही ट्वीट करत अजित पवारांना प्रतिउत्तर दिले आहे.
‘राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याचं नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाझळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर.’ असा खोचक टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याच नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाजळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 27, 2021
दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यावरूनही अजित पवार यांनी राणेंवर निशाणा साधला. बँकेला उंच स्तरावर नेणाऱ्या व्यक्तींनाच निवडून आणा. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. प्रतिभावान व्यक्तीच्या हातातच बँक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘भाजप कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस थांबवा अन्यथा..’, नारायण राणेंचा इशारा
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
