🕒 1 min read
सिंधुदुर्ग : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी तीक्ष्ण चाकूने त्यांच्यावर वार केले होते. याप्रकरणी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला (Sachin Satpute) सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्व असलेल्या भाजप नेत्यांकडे पोलिसांनी आता मोर्चा वळवला आहे. या चाकू हल्ल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचे पती गोट्या सावंत, (Gotya sawant) नितेश राणे यांच्यासह अनेकांची सिंधुदुर्ग पोलिसांनी चौकशी केली आहे.
याबाबत नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होण्याची आशा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते मला नाहक शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘भाजप कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस थांबवा अन्यथा..’, नारायण राणेंचा इशारा
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
