🕒 1 min read
नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू (Archbishop Desmond Tutu) यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. टूटू यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
आर्चबिशप डेसमंड टूटू यांना देशाचा ‘Moral Compass’ म्हणून ओळखले जात होते. जगभरात वर्णभेदाविरोधातील लढाईचं प्रतिक राहिलेल्या नेल्सन मंडेला यांचे डेसमंड टूटू हे समकालीन होते.वर्णभेद आधारित भेदभाव तसंच फुटीरवादी धोरण नष्ट करण्याच्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता. र्णभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच १९७० च्या दशकात एका युवा पादरीच्या भूमिकेसोबतच ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारच्या विरोधकांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने जगभर शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, डेसमंड हे दक्षिण आफ्रिकेची शान होते. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वतंत्र दक्षिण आफ्रिका बनवण्यात मुख्य पादरी डेसमंड टूट यांचं मोठं योगदान होतं. ते प्रखर देशभक्त, सिद्धांतांनुसार चालणारे तसंच व्यावहारिक नेते होते. त्यांनी बायबलमधील संदेश अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. कामाशिवाय धर्माला कोणताच अर्थ राहत नाही, असं ते म्हणत असत, असे सिरील रामफोसा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘भाजप कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस थांबवा अन्यथा..’, नारायण राणेंचा इशारा
- पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
