🕒 1 min read
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची काल(२५ डिसें.)जयंती होती. त्यांच्या जयंती निमित्त शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. तसेच धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे वाजपेयीनीं दाखवून दिल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. या संदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’
शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका??? pic.twitter.com/h2PscR1M3E
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 26, 2021
दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले होते की,’पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. ‘हिंदू अब मार नही खाएगा’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पण त्याचा अर्थ ‘कोई और मार खाएगा’, असा नव्हता. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, हे सूत्र त्यांनी कसोशीने पाळले. धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचं राजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.’
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
- ‘ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
