Share

अखेर औरंगाबाद महानगरपालिकेने भरले ९५ कोटी; नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मिळणार गती..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: शहराची तहान भागविणाऱ्या १६८० कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेऊन आतापर्यंत ९५ कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले असून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) यांनी सोमवारी (दि.२०) दिल्या. त्यामुळे आत्तापर्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या या योजनेला आता तरी गती मिळेल अशी अपेक्षा औरंगाबादकरांकडून व्यक्त केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे नविन पाणी पुरवठा योजनाची आढावा बैठक आज सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकी पूर्वी सकाळी महानगर पालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नक्षत्रवाडी येथील एमबीआर, डब्ल्यू टी.पी. तसेच पाईप निर्मिती प्लांटची पाहणी केली. पाणीपुरवठा साठी लागणाऱ्या पाईपचे उत्पादन १५ जानेवारी २०२२ पर्यंत सुरु करा अशा सूचना पाण्डेय यांनी दिल्या. त्यानंतर ईटखेडा येथील ईएसआर या उंच टाकीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, शहर अभियंता एस. डी. पानझडे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे आयोजित बैठकीत १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना प्रशासक पाण्डेय म्हणाले की, पाणीपुरवठा योजनेच्या कामाला निधीची अडचण येणार नसून त्याची काळजी महापालिका प्रशासनाने घेतली आहे. महानगरपालिकेच्या वतीने या कामासाठी १७ कोटी आणि आज ७५ कोटी असे एकूण ९५ कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कामाची गती वाढवण्यात यावी.

पैठण ते औरंगाबाद दरम्यान अडीच हजार मिमीची पाईपलाईन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामाची प्रगती लक्षात यावी यासाठी बारचार्ट पालिका प्रशासनाला देण्यात यावा, जेणेकरून कामाचा आढावा घेणे सोपे जाईल. पैठण ते औरंगाबाद दरम्यान अडीच हजार मीमी व्यासाची पाईप लाईन टाकण्यासाठी नॅशनल हायवे अथोरिटी(राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) ची परवानगी लवकरात लवकर घेण्याच्या सूचनाही मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी एमजेपीला दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!