Share

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यासोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आदरणीय खासदार शरद पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहकार्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मेगा जॉब फेयर २०२१ आयोजित करण्यात आले आहे.’

दरम्यान, पुढे मलिकांनी सांगितले की,’या मेगा जॉब फेयरचे उद्घाटन आज माझ्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या मेगा जॉब फेयर २०२१ ची नोंदणी १७ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://aaplesaheb.org या संकेतस्थळाला भेट द्यावी’, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!