🕒 1 min read
मुंबई : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघांना अटक झाली आहे. यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात पडळकरांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा न चुकता हिशोब घेतात पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडित असलेल्या म्हाडा नोकर भरतीबाबत लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ते मागील आठवड्यापासून म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा होणार आहे त्यात तुम्ही बळी पडू नका असे वारंवार प्रसार माध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि गृहखाते राष्ट्रवादीकडे असतांना सुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता हि परीक्षा का रद्द करावी लागली? यावरून हे सिद्ध होतंय की महाराष्ट्रातल्या या प्रस्थापिताच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यामध्ये रस आहे. एक-एक पैसे गोळाकरून परीक्षेसाठी पोहोचलेल्या बहुजनांच्या पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजनांच्या मुलांविषयी त्यांना काहीही देणं घेणं राहिलेलं नाही.’
@Awhadspeaks #गृह_निर्माण खात्याचा दर आठवड्याला न चुकता हिशोब ठेवणाऱ्यांना #MHADA भरतीबाबत मात्र लक्ष द्यायला वेळ नाही.जर #घोटाळ्याची पूर्व कल्पना होती, #गृहखातेही #राष्ट्रवादीकडेच आहे तर त्यांना रात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?
@NCPspeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/ZtzJimNLN3— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) December 12, 2021
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भरती परीक्षे संदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले की,‘सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो’, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली- संजय राऊत
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- ‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
