Share

पाकिस्तान दौऱ्यावर असलेले वेस्ट इंडिजचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, T20 मालिकेतून बाहेर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून, सोमवारी T20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याआधीच वेस्ट इंडिजसंघातून एक वाईट बातमी समोर येत आहे. विंडीजचे खेळाडू शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrel), रोस्टन चेस (Roston Chase), आणि काइल मेयर्स (Kyle Mayers) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 मालिकेनंतर वनडे मालिकाही खेळवली जाणार आहे.

पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या तीन खेळाडूंचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, याशिवाय प्रशिक्षक नसलेल्या सदस्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तीन खेळाडू आणि एका सदस्याला 10 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. शेल्डन कॉटरेल, रोस्टन चेस आणि काइल मेयर्स यांना टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या सर्व खेळाडू तसेच स्टाफमधील मेंबर यांनी सर्वांनी कोरोना विरूद्ध लस घेतली होती, सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येकामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या समस्येची तक्रार केलेली नाही. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सोमवारी पहिला टी-२० सामना रंगणार आहे. या मालिकेनंतर दोघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

तीन खेळाडू आणि कर्मचारी वगळता संपूर्ण संघाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही मालिका निश्चित वेळापत्रकानुसार खेळवली जाईल. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानातून मालिका न खेळताच परतल्यानंतर पाकिस्तानमध्ये होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेट मालिका आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!