Share

मुंबई कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेवनवर माजी पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईत खेळवला जाणार आहे आणि या कसोटी सामन्यापूर्वी प्रत्येकजण भारतीय प्लेइंग इलेव्हनबद्दल आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता पाकिस्तानचा माजी लेग-स्पिनर दानिश कनेरियाचे देखील नाव आहे. कनेरियाच्या मते, भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला संधी द्यायला हवी आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ला वगळून विराट कोहलीचा समावेश करायला हवा.

मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे मुंबई कसोटीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. हा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला आणखी एक संधी द्यावी, असे कनेरियाचे म्हणणे आहे.

कनेरिया आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, मी अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच घेईन आणि पुजाराला वगळेन. पुजाराच्या जागी कोहलीला घेईल. रहाणेला हा कसोटी सामना देण्याची गरज आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. अगोदरच दडपणाखाली असलेल्या रहाणेला हेही माहीत असेल की ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकते. ड्रॉप झाल्यानंतर परत येणे कठीण आहे.

फलंदाजीसोबतच कनेरियाने गोलंदाजीतही बदल करण्याची मागणी केली आहे. मोहम्मद सिराजला वानखेडेची खेळपट्टी आवडेल आणि इशांत शर्माच्या जागी त्याचा समावेश करावा, असे कनेरियाचे मत आहे. गोलंदाजीत बदल हवा आहे, कारण हा महत्त्वाचा सामना आहे त्यामुळे अनुभवाची गरज आहे, म्हणून प्रसिद्ध कृष्णा हा योग्य पर्याय नाही. मी इशांत शर्माला विश्रांती देईन आणि मोहम्मद सिराजला संधी देईन. कारण त्याच्याकडे वातावरणासह चेंडूची हालचाल करण्याची कला आहे. म्हणून मी सिराजला संधी देईन.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!