Share

गुलाम नबी आझाद यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला…’

Published On: 

🕒 1 min read

राजौरी : क्राँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद(Gulab Nabi Azad) हे सध्या पुंछ आणि राजौरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बुधवारी(१ डिसें.)माध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी आपल्या पक्षाला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये ३०० जागा जिंकेल असे आपल्याला वाटत नसल्याचे मत आझाद यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलत असतांना आझाद म्हणाले की,’आपल्याकडे ३०० खासदार कधी असणार? त्यामुळे मी तुम्हाला (कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे) आश्वासन देऊ शकत नाही कारण काहीही झाले तरी त्यासाठी २०२४ मध्ये ३०० खासदार निवडून येणं गरजेचे आहे. देव करो आणि आपले ३०० खासदार निवडून येवोत. पण सध्याची परिस्थिती पाहता हे होईल असं वाटतं नाही. त्यामुळेच मी तुम्हाला खोटी आश्वासनं देत नाहीय आणि कलम ३७० बोलणं टाळतोय’, असे आझाद म्हणाले.

दरम्यान, आझाद यांच्या या वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली असून ते म्हणाले की,’सर्वोच्च न्यायालयाने हे (कलम ३७० चं) प्रकरण हाती घेण्यापूर्वीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पराभव स्वीकारला आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!