🕒 1 min read
कानपूर : भारताचा (Team India) अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने हरभजन सिंग (Harbhajan Singh) चा सर्वाधिक ४१७ कसोटी बळींचा विक्रम मागे टाकला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापुढे आता दोन भारतीय गोलंदाज आहेत, ज्यात अनिल कुंबळे (६१९ बळी) आणि कपिल देव (४३४ बळी) यांचा समावेश आहे. या मोठ्या विक्रमाबद्दल खुद्द हरभजन सिंगने अश्विनचे अभिनंदन केले असून भविष्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हरभजन सिंगने कसोटी विकेट्स मध्ये आपला विक्रम मोडल्याबद्दल आर अश्विनचे अभिनंदन केले आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘रविचंद्रन अश्विन, माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा. मला आशा आहे की भविष्यातही तू आणखी विकेट घेशील. देव आशीर्वाद देवो आणि असाच चमकत राहा.’ टीम इंडियाचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने 2015 साली श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. हरभजन सिंगने 103 कसोटी सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत, मात्र आर अश्विनने टॉम लॅथमची विकेट घेत 418 वी कसोटी विकेट घेतली आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या 80 व्या कसोटी सामन्यात ही मोठी कामगिरी केली आहे.
रविचंद्रन अश्विनने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कारकिर्दीची सुरुवात केली होती. 10 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने टीम इंडियाला अनेक मोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. अश्विनचा विक्रम देश-विदेशात उत्कृष्ट राहिला आहे. तो भारतात 48 वा सामना खेळत आहे आणि यादरम्यान त्याने टॉम लॅथमच्या रूपाने 291 विकेट घेतल्या. त्याने परदेशी मैदानावर 31 सामन्यांत 123 बळी घेतले आहेत, तर एक सामना तटस्थ ठिकाणी खेळला आहे ज्यात त्याने 4 बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने १३ वे स्थान पटकावले आहे. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन ८०० बळींसह आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’

