🕒 1 min read
मुंबई: कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी केला. आता ते आणखी नवे घोटाळेबाहेर काढणार असून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि ४० चौरांचा हिशेब लोकांपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी आता ट्वीट करत म्हटले आहे.
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम काम ठाकरे सरकारने केले. शेवटी आम्ही राज्यपालांकडे गेल्यानंतर ठाकरे यांनी पाठ फिरवली आणि सर्व पेपर फाडले. आम्ही त्या ठिकाणी रुग्णालय बांधणार नाही, असे नंतर त्यांनी सांगितले. खरे तर हे रुग्णालय बांधण्याचे काम नव्हते, तर कोविडच्या नावाखाली जमीन बळकावण्याचे काम होते.असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Will Expose Scams of 3 More Leaders of Thackeray Sarkar in December
Tomorrow I will be in Amarawati & Jalna Day After Tomorrow
ठाकरे सरकारच्या आणखी तीन नेत्यांचे घोटाळे डिसेंबरमध्ये उघड करणार
उद्या मी अमरावती आणि परवा जालन्यात असेल @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/vNEhH8oUNs
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 29, 2021
दरम्यान ११ नोव्हेंबर २०२० रोजी पहिला घोटाळा आपण बाहेर काढला. आता आणखी काही नवे घोटाळे बाहेर काढणार आहे. अलीबाबा अणि ४० चोरांचा हिशेब येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ठेवणार आहे.प्रताप सरनाईक भरपूर बोलत होते. पण, ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर ते आता कुठे गेले? असे अनेक सावक किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

