🕒 1 min read
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता
मुंबई : राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास महिनाभरापासून सुरुच आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो एसटी कर्मचारी मागील 14 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल चार ते साडे चार तास खलबतं झाली. त्या बैठकीत तोडगा निघाला नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं होतं.
मात्र, आता शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनिल परब यांना महत्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन आणि सुविधा आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि सुविधा देण्याबाबतीत समान स्तरावर असल्याचं समोर आलं. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, अशी सूचना पवार यांनी परबांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही.
शरद पवारांनी याबाबत अनिल परब यांना सूचना दिल्या आहेत.
- एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्या.
- पगारवाढ देताना अगदी कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा.
- पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो आर्थिक ताण पडेल, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी वर्षभराची तरतूद करावी.
- आर्थिक भार सोसावा लागेल तरी चालेल पण भरघोस पगारवाढ द्या.
महत्वाच्या बातम्या
- सरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं वक्तव्य
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
- रुपाली पाटील मनसे सोडणार?, बेधडक वक्तव्याने चर्चांना उधाण
- कट कारस्थानं झाली नसती तर आज निकाल वेगळा असता- शशिकांत शिंदे
- पत्नीला दिलेली प्रेमाची अनोखी निशानी, ज्याने पाहिले तो म्हणाला- ‘वाह ताज’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
