🕒 1 min read
मुंबई : लवकरच सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री महिमा मकवाना ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि महिमा यांच्यात काही इंटिमेट आणि रोमँटिक दृश्य चित्रित करण्यात आले आहे.
दरम्यान रोमँटिक दृश्य करताना आयुष शर्मा हा फार गोंधळला होता. त्याने स्वत:च याबाबतची माहिती दिली आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्याला होने लगा या महिमासोबतच्या गाण्याबद्दल, त्यातील रोमँटिक दृश्यांबद्दल फार अस्वस्थ झालो होतो, असे तो म्हणाला. मला सतत माझी पत्नी अर्पिता आणि माझ्या मुलांचे विचार मनात येत होते. कोणतेही इंटिमेट सीन करताना मी फार अस्वस्थ आणि नर्व्हस झालो होतो. माझ्या मनात फक्त असा विचार होता की ते ऑनस्क्रीन काहीही दाखवत नाही. हे सर्व माझी पत्नी पाहत नाही. माझी मुले काही बघत आहेत का? मला पुढे काय होणार हे माहिती नव्हते. माझ्या मनात हजारो विचार येत होते,” असेही त्याने सांगितले. या चित्रपटात किसिंग सीनची गरज आहे. पण त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी किसिंग सीन करु शकत नाही,” असे म्हटले.
हा एक गँगस्टर चित्रपट आहे. त्यामुळे यात एखाद्या लव्हस्टोरी असू शकत नाही. असे सांगत मी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ‘मी लहान मुलासारखा महिमाकडेही गेलो आणि तिला सांगितले की तूही त्यांना सांग मी असे सीन करण्यास अस्वस्थ आहे,” असे त्याने सांगितले. अंतिम’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. तर सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत असून हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- ‘माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
