Share

औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गास नितीन गडकरींचा ग्रीन सिग्नल; पाणी पुरवठा योजनेस मिळणार गती!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी सोमवारी (दि.१५) केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यायामुळे औरंगाबाद शहरासाठी मंजूर झालेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी देसाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी दोहोंमध्ये विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यांतील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी ७ किलोमीटरचा बोगदा तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निधी मंजूर करून तत्काळ बोगद्याचे काम मार्गी लावण्याची मागणी देसाई यांनी यावेळी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिर्डी-औरंगाबाद दरम्यान दुहेरी महामार्गाचे काम हाती घेतले असून त्यासाठी विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्त करावी. डीएमआयसी अंतर्गत असलेल्या ऑरिक सीटीच्या विकासासाठी शेंद्रा ते बिडकीन दरम्यान चार पदरी महामार्ग तातडीने पूर्ण करण्यात यावा.

तसेच औरंगाबाद ते पैठण दरम्यान चार पदरी महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी देसाई यांनी केली. औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चार पदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे. याच मार्गा लगत शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी या मार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्याची गरज आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यास गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठा योजनेला गती मिळणार असल्याचा विश्वासदेसाई यांनी व्यक्त केला. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!