Share

किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : किरण रावच्या घटस्फोटानंतर अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा सिंगल झाला असून, या सिंगलपणाची झलक त्याच्या ड्रेसिंग सेन्समध्ये पाहायला मिळत आहे. आमिरला नुकताच स्पॉट करण्यात आला आणि यावेळी त्याचा लूक पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. अलीकडे घटस्फोटामुळे चर्चेत असलेला आमिर खान रात्री उशिरा पहिली पत्नी रीना दत्ताच्या घरी पोहोचला. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान घटस्फोटानंतर देखील आमिर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता आणि किरण राव या दोघींसोबत चांगली मैत्री आहे. आमिर अनेकदा रीना दत्ता आणि किरण रावसोबत लंच-डिनर करतो. यासोबतच सर्वांच्या भेटीगाठीही सुरू असतात. रात्री उशिरा आमिर जेव्हा रीना दत्ताच्या घरी पोहोचला. यावेळी आमिर कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यादरम्यान आमिरने कोरोनापासून वाचण्यासाठी फेस मास्क लावला होता. आमिरने त्याची पहिली पत्नी रीना दत्ताला घटस्फोट दिला आणि किरण रावशी लग्न केले. मात्र, १५ वर्षांनंतर आमिर आणि किरण राव यांचाही घटस्फोट झाला. आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे.

आमिर खान लवकरच त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. करीना कपूर खान देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!