🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. या योजनेचा वैजापूर तालुक्यातील ३६ हजार १८९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. मात्र अद्याप ५०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आधार प्रमाणीकरण करण्याकरीता शेवटची संधी म्हणून १५ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीस २०१९ पासून सुरुवात केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने काही निकष लावले होते. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे होते. यात वैजापूर तालुक्यातील ३६ हजार ६९१ शेतकऱ्यांचे अर्ज व प्रस्ताव अपलोड करण्यात आले होते. यातील ३६ हजार १८९ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विशीष्ट क्रमांकासह प्राप्त झाले असून या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
प्रमाणीकरण करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज मुक्ती पोटी १५० कोटी ४९ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. दरम्यान अद्याप ५०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे कर्ज मुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. संबंधीत शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करून कर्ज मुक्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक निबंधक विनय धोटे यांनी केले आहे. तहसिलदार यांच्या कडे १७६ तक्रारी प्राप्त होत्या. त्यातील ४ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. तर जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समितीकडे ३२६ तक्रारी आल्या होत्या. त्यातील १९ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर राज्यातील सर्वच महामंडळाचे कर्मचारी आंदोलने करतील- अजित पवार
- ‘रझा अकादमीचा संस्थापक अध्यक्ष अफगाणिस्थानचा’, नितेश राणेंचा आरोप
- तुम्ही चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं; अजित पवारांचे पोलीस अधिकाऱ्यांना खडेबोल
- ‘माझ्या सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा…’ रोहित शेट्टीचा सवाल
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार

