Share

‘महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या विकासाची स्थिती’; १८ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत विशेष परिषद!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: सेंटर फॉर डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस आणि दुआ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.१८) औरंगाबाद शहरात ‘सिच्युएटिंग डेव्हलपमेंट ऑफ मुस्लिम इन महाराष्ट्र’ या विषयावर विशेष परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या आरक्षण आणि विविध समित्यांच्या निष्कर्षांवर चर्चा करणे हे प्रामुख्याने या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मधील स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे प्राध्यापक डॉ. अब्दुल शाबान आणि पॅरिस विद्यापीठातील व्हिजिटिंग प्रोफेसर ज्यांनी मुस्लिमांसाठी आरक्षणाची शिफारस केलेल्या महेमुद उर रहमान समितीच्या अहवालाची रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ते या परिषदेत आपली भुमिका मांडणार आहे. इतर वक्त्यांमध्ये डॉ वेंकटनारायण मोतुकुरी, सहयोगी प्राध्यापक आणि समन्वयक, संशोधन सेल ऑन एज्युकेशन (RESPPG), सेंटर फॉर इकॉनॉमिक अँड सोशल स्टडीज (CESS), हैदराबाद हे आहेत. जे देशभरातील आरक्षणांवर बोलतील.

मुस्लिम आरक्षणासाठी उच्च न्यायालयात लढलेले प्रख्यात वकील सगीर खान हे महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीवर भाष्य करणार आहेत. सीडीपीपीचे संशोधन संचालक प्रोफेसर अमिरुल्लाह खान यांच्यासह अंजना दिवाकर हे या परिषदेचे सूत्रसंचालन करणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी खुली असेल. ज्यात नामवंत अभ्यासक, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, वर्तमानपत्रांचे संपादक इत्यादींचा समावेश असेल.

दुआ फाऊंडेशनचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ही परिषद अत्यंत महत्वपुर्ण असणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने या निर्णयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!