🕒 1 min read
सातारा : अभिनेत्री कंगना रणावत बेधडक वक्तव्य करण्यास चर्चेत असते. कंगनाला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर एका मुलाखतीत कंगनानं केलेल्या वक्तव्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यातच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोखलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलंय. मात्र, त्यांच्या विधानाचा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला असून काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो. विक्रम गोखलेंना वाटत असेल, तर त्यांनी राजकीय पक्षात सामोरं व्हावं, असा टोला चव्हाण यांनी कंगना आणि गोखलेंना लगावलाय.
चव्हाण म्हणाले, विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल. विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही. रक्तरंजित क्रांती झाली नाही हेच या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.”
कंगनाच्या वक्तव्याबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करून ज्या लोकांनी आपले बलिदान दिले, ज्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे अशी विधाने केली जातात परंतु अशा व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची विधानं करण्यासाठीची मानसिकता भारतीय जनता पक्षाकडून पसरवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर राज्यातील सर्वच महामंडळाचे कर्मचारी आंदोलने करतील- अजित पवार
- ‘रझा अकादमीचा संस्थापक अध्यक्ष अफगाणिस्थानचा’, नितेश राणेंचा आरोप
- तुम्ही चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं; अजित पवारांचे पोलीस अधिकाऱ्यांना खडेबोल
- ‘माझ्या सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा…’ रोहित शेट्टीचा सवाल
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
