🕒 1 min read
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या निधानानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत लिहिले की, ‘महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५:०७ वा. प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ म्हणत दु:ख व्यक्त केले आहे.
वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५:०७ वा. प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/1qb2buqZ0z
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 15, 2021
बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. त्यांनी इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य खूप मोलाचे आहे. त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला’
- शिवसेनेचा बुलंद आवाज, महविकास आघाडीची धडाडती तोफ; आव्हाडांच्या राऊतांना शुभेच्छा
- ‘या’ अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे- मुख्यमंत्री ठाकरे
- शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे जीवनातली मोठी उपलब्धी- राज्यपाल कोश्यारी
- पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
