🕒 1 min read
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (१५ नोव्हें.) पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाली, ही माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाची शंभरी पार केली होती. बाबासाहेबांच्या निधनानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बाबासहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साहाय्याने वन्ही तो चेतवावा, चेतविता चेततो या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ बाबासाहेबांनी दूर केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड श्रद्धा हे बाबासाहेबांचे बलस्थान. या बलस्थानाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रासह अवघे विश्व जिंकले. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण करणारे बाबासाहेब आमचा मानबिंदू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा बुलंद आवाज, महविकास आघाडीची धडाडती तोफ; आव्हाडांच्या राऊतांना शुभेच्छा
- ‘या’ अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे- मुख्यमंत्री ठाकरे
- शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे जीवनातली मोठी उपलब्धी- राज्यपाल कोश्यारी
- पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे
- पुरंदरेंच्या जाण्यानी मनाला अतिशय वेदना होत आहेत-देवेंद्र फडणवीस

