Share

शरद पवारांच्या या ‘पॉवरफुल्ल’ पत्रामुळे छगन भुजबळ जेलबाहेर ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षानंतर भुजबळ हे तुरुंगाबाहेर येणार आहेत. यापूर्वी अनेकवेळा भुजबळ यांचा जमीन नाकारण्यात आला होता.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४५ घटनाबाह्य ठरवले होते. त्यामुळे भुजबळांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, मात्र अस असल तरी मार्च महिन्यामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक ‘पॉवरफुल्ल’ पत्रही याला कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

८ मार्च रोजी ‘छगन भुजबळांचे काही बरवाईट झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हीच जबाबदार असाल म्हणत’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. यामध्ये भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करत त्यांना योग्य उपचार देण्याची मागणी पवार यांनी केली होती.

काय होत शरद पवार यांच पत्र ?

काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या ढासळत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला अतिशय चिंता वाटत आहे. त्यांचं वय ७१ वर्ष असून ते १४ मार्च २०१६ पासून (२ वर्ष) तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती अतिशय कमकुवत झाली आहे.

हे कायदेशीर प्रकरण आहे. माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल. जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे. हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही.

छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून ५० वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही.

माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे.

मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!