Share

मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर

Published On: 

मुंबई : यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने तयारी पूर्ण करण्यात आल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख आज काय भूमिका मांडतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली झाल्याचे पहावयास मिळाले आहे. उपस्थितीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. न्यायालयीन लढाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने अनेक संभाव्य अडथळे दूर करण्यात आले आहेत.

यावेळी संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण महत्वाचे आहे.  मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून आजचा मेळावा होईल. मेळाव्यातून महाराष्ट्राला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल. असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

रात्रीतून मोठ्या हालचाली, अडथळे केले दूर

कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे अनेक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गर्दी होण्याचे संकेत पक्षाला मिळाले होते. यावर विरोधकांतूनही प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे न्यायालयीन तक्रारी वाढण्याची भीती होती. या कारणामुळे पक्षाने मर्यादा हटविली आहे. षण्मुखानंद हॉलमधील बंद सभागृहात होणाऱ्या मेळाव्याला आता २०० व्यक्तींच्या मर्यादा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळे या मेळाव्यात आता एकूण क्षमतेच्या ५० टक्के म्हणजे एक हजारहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.

राज्यात २२ ऑक्टोबरपासून बहतांश निर्बंध शिथिल होणार आहेत. मात्र, कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. अशा स्थितीत दसरा मेळाव्यात गर्दी होऊन करोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांची टीका आणि न्यायालयीन लढाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता काहींनी पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि या मेळाव्यापुढील संभाव्य मोठा अडथळा दूर करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!