Share

ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावं- साध्वी प्रज्ञा

Published On: 

जोधपुर: साध्वी प्रज्ञा यांनी आसाराम बापूला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावे, अशी प्रार्थनाही साध्वी प्रज्ञा यांनी केली. बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. साध्वी प्रज्ञा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये आल्यानंतर बोलत होत्या.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा ?
“न्यायालयाचा निर्णय तर येईलच. न्यायाधीश काय निर्णय सुनावतील, हे त्यांच्यावर आहे. मात्र मला वाटतंय की, ईश्वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावं. कारण ते दोषी नाहीत.”

काय आहे प्रकरण?

मुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!