🕒 1 min read
अबुधाबी : कोहली व देवदत्त पडीक्कल आणि मॅक्सवेल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह बेंगळुरूने आपल्या प्ल्ये ऑफच्या अशा देखील कायम ठेवल्या आहेत. आयपीएलच्या या 43 व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना बेंगळुरूने कोहली व देवदत्त पडीक्कलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला.
य मॅचमध्ये आरसीबीने फलंदाजी, गोलंदाजी, तसेच क्षेत्ररक्षण यामध्ये कमाल कामगिरी केली. बॉलर्सनी राजस्थानला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं तर बंगळुरुच्या फिल्डर्सनीही चांगली साथ दिली. यामध्ये बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली यामध्ये सर्वात आघाडीवर होता. विराटनं या सामन्यात अफलातून क्षेत्ररक्षणाची झलक दाखवली.
#MORRIS ne shot maara Goli ki Raftaar se!! Magar Raste me aagye Goli se tez KOHLI❤️???? #RCBvRR #ViratKohli pic.twitter.com/5Rx3A9dDGL
— Swapnil Cristiano (@swAp_cr7) September 29, 2021
या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोहम्मद सिराजनं टाकलेल्या ओव्हरमध्ये ख्रिस मॉरीस ऑफ साईडला जोरदार फटका लगावला. तो बॉल बाऊंड्री लाईन पार करून चार रन मिळवणार असे सगळ्यांना वाटत असताच कोहलीने जबरदस्त वेगानं बॉलच्या दिशेनं झेपावला. विराटनं हो बॉल एका क्षणार्धात पकडला आणि विकेट किपरकडं थ्रो केला. विराटचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या या जबरदस्त फिल्डिंगवर ख्रिस मॉरीसचाही क्षणभर यावर विश्वास बसला नाही. कोहलीनीने त्याचे चार रन अडवल्याने त्याच्या चेहऱ्यावर निराशा देखील दिसली.
महत्त्वाच्या बातम्या
- कोहलीसेनेचा ‘विराट’ विजय; राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून मात
- ठाकरे सरकारनं ऐकलं ! ‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी सीईटी प्रवेश परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; आता आणखी एका परीक्षेची तारीख बदलली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
