मुंबई : काही दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि यानंतर परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु यात गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती पण त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार होणार असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले होते.
परंतु आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि टीईटी एकत्र आल्याने राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना परीक्षेच्या तारखा बदलण्याबाबत चर्चा करून विनंती केली असल्याची माहिती दिली होती.
याच विनंतीला मन देऊन शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बैठक घेऊन टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना येत्या काळात होणार्या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आंबडेकरांनी दिलेले संविधान बदलण्याचा भाजपचा घाट ; नाना पटोलेंचा घणाघात
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करा, राज्यमंत्री सत्तारांचे निर्देश!
- त्रिसदस्यीय प्रभाग रचनेस रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध – रामदास आठवले
- मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं केलेलं आवाहन म्हणजे…; भातखळकरांनी उडवली खिल्ली

