🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची कळकळीची विनंती ठाकरे सरकारला केली आहे.
‘राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही.
कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा’ अशी कळकळीची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला केली आहे.
आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे. #MaharashtraRains
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करा, राज्यमंत्री सत्तारांचे निर्देश!
- ‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले; पंकजा मुंडेंचा सरकारवर निशाणा
- अस्मानी संकट ! अतिवृष्टीने 436 नागरिकांनी जीव गमावला, तर 196 जणांचा वीज पडून मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
