Share

तुटपुंज्या उत्पन्नात तरुणीचे भुकेल्या कुत्र्यांसाठी अन्नछत्र!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : रस्ता का घाण करत आहेस?, तुला दुसरे कुठलेही काम नाही का?, हा काय तुझा बापाचा रस्ता आहे का? अशा अनेक गोष्टी आत्तापर्यंत तिने ऐकलेल्या आहेत. नव्हे तिला दररोज लोकांच्या विचित्र नजरा, कुत्सितपणे हसणे, टिका या गोष्टींना सामोरे जावे लागते. अनेकदा हे सर्व सोडून द्यावे असेही वाटते. मात्र अशावेळी भुकेने व्याकूळ झालेल्या कुत्र्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अन सर्व काही विसरुन मी पुन्हा त्याच जोमाने कामाला लागते असे ती म्हणाली. महाराष्ट्र देशाच्या गणेशोत्सवात कोमल तसामडने आपल्या समाज कार्याविषयी विशेष भूमिका मांडली.

कोमल चार वर्षांची असतांना तिच्या वडिलांनी घरी एक अतिशय लोभस, छोटासा कुत्रा घरी आणला. दहा-बारा वर्षे त्यांच्या घरी तो होता. अचानक एके दिवशी काही व्रात्य मुलांनी बांबूने त्यांच्या पायावर जोरदार वार केला. त्याच्या पायाचे हाड तुटले होते. डॉक्टर बदलले. खर्च केला. मात्र फरक पडत नव्हता. मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले. घरातील कुत्र्याच्या जाण्याने कोमल एकाकी झाली. रस्त्यावर अनेक भटकी कुत्री आपल्याला दिसतात. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे हा निश्चय तिने केला. पॉकेट मनीतून मिळणाऱ्या पैशातून तिने भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर तिला नोकरी मिळाली. नोकरी लागल्यानंतर तिने या कुत्र्यांच्या जेवणाचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. गेल्या ३ वर्षांपासून एन-२ भागातील कुत्र्यांना ती एक वेळचे जेवण देत आहे. आजारी असतांनाही तिने यात कधीही खंड पडू दिला नाही. आपल्या या दोस्तांसाठी ती गावालाही जात नाही, ना कधी फिरायला. महाराष्ट्र देशाच्या गणेशोत्सवात विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरतीचा उपक्रम राबवला. समाजकार्यात काम करणार्‍या कोमल तसामड या तरुणीला आरतीचा मान मिळाला. याप्रसंगी तिने या संधीसाठी आभार व्यक्त करत ‘महाराष्ट्र देशा’च्या माध्यमातून समाजातील इतर घटकांनाही कुत्र्यांप्रति दयेची भावना दाखवण्याचे आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!