🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.
तर याला उत्तर देताना आता हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे.
तर यावर आता चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही.
हॅब्रीड अॅनोविटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि ४० टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं आणि आता काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅनोविटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झाले आहेत. ती मग तुमच्या सरकारने थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही.’ असे रोखठोक मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- सोमय्यांना कोणी सिरीयस घेत नाही; त्यांनी आधी स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्यावं – मलिक
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार; मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- सोमय्यांना चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली मग त्यांनी माझ्यावर आरोप केले-हसन मुश्रीफ
- स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

