🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभारातून आक्रोश नोंदवला जात आहे. यावर आता अभिनेता आरोह वेलणकर याने महाराष्ट्र देशाशी बोलताना संतप्त प्र्तिक्रिया दिली आहे.
याप्रकरणी आरोह वेलणकर म्हणाला की, मुंबईमधील साकीनाकासारख्या वर्दीच्या ठिकाणी अमानुषपणे एका महिलेवर बलात्कार होणे हे खरच निंदनीय आहे. मागील काही दिवसापूर्वीच पुण्यात देखील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुंबई- पुणे यासारख्या ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे या घटनावरून आता दिसत आहे. या नराधमांना लवकरात लवकर कडक शिक्षा होण अपेक्षित आहे.
तसेच तो पुढे म्हणाला, मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेवर कोणीच प्रतिक्रिया द्यायला पुढे का येत नाही? जे लोक अशा विषयावर #चा वापरत करत ट्विट करतात तसेच कॅंण्डल मार्च काढण्यास सुरु करतात ते लोक अजूनही या घटनेबाबत आवाज उठवताना का दिसत नाही?, युपीमध्ये घडलेल्या घटनेवर लगेचच प्रतिक्रिया देता मग आपल्याच राज्यात घटना घडली तर लोक बोलत का नाहीत?,असे प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्ध 5 वी कसोटी रद्द झाल्यानंतर खेळाडूंच्या अडचणीत वाढ
- बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर गावसकर खूश; म्हणाले, ‘मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर…’
- रवी शास्त्रींची जागा मिळणार धोनीला?
- कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याबाबत २२ सप्टेंबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता
- आयपीएलमुळे सामना रद्द; इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं सुचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
