🕒 1 min read
मुंबई : तेरा वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करणारा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. सध्या या शोमधील बबिता आणि टप्पू यांची रियल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर झाली आहे.
https://twitter.com/aqqu___/status/1435864327102210050?s=20
‘तारक मेहता..’ शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात विशेष स्थान मिळविले आहे. मात्र या शोच्या कलाकारांबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी एका व्यक्तीला डेट करत आहेत. ही व्यक्ती म्हणजे राज अनादकत (टप्पू)आहे. मुनमुन दत्तापेक्षा तो तब्बल नऊवर्ष लहान आहे.
Jethalal after hearing the news of Babita & tapu's relationship #jethalal #tapu pic.twitter.com/nBi4FO6jFp
— Garima Katiyar???????? (@_weirdotweets) September 9, 2021
दरम्यान, मात्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चानी आता चांगलाच जोर धरला आहे. सध्या या दोघानाचे मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री सर्वांच माहित आहे. मात्र जेठालालचा मुलगा अर्थात टप्पूच बबितावर प्रेम करत असल्याचे समोर आल्यानंतर यावर मिम्स व्हायरल होणे स्वाभाविक आहे.
Future Scenes From Jethalal House..????????????????#Jethalal #TMKOC pic.twitter.com/tSOJzNlcX1
— Jethalal (@Jethiya_lal) September 9, 2021
बऱ्याच काळापासून, राज आणि मुनमुन दत्ताच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि कमेंट याकडे लक्ष वेधत होत्या. सोशल मीडिया नेटकऱ्यांना अनेकदा मुनमुनच्या फोटोंवर राज यांच्या प्रतिक्रिया दिसल्या. आता हे स्पष्ट झाले आहे की दोघेही चांगल्या मित्रांपेक्षा जवळ आहेत. दोघेही आजकाल एकमेकांच्या प्रेमात असून त्यांची प्रेमकथा चांगलीच गाजत आहे. विशेष म्हणजे राज अनादकत (टप्पू )हा तब्बल नऊवर्षांनी लहान आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीममधील प्रत्येक सदस्याला दोघांमध्ये काय चालले आहे याची जाणीव आहे. या बाबत त्यांच्या कुटूंबियांना देखील माहीतअसल्याचं ही बोललं जात आहे.
https://twitter.com/AshutoshManglam/status/1435877111458242567?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मतांची विभागणी न होवू देता जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर मविआकडे स्थानिक स्वराज्य संस्था येतील’
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
