🕒 1 min read
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
परब यांच्यासह शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या देखील ईडीच्या रडारवर आहेत. ईडीचे धाड सत्र सुरु असून अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी यांच्यासह एकनाथ खडसे या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींवरून भाजपवर महाविकास आघाडीतील नेते आरोप करत असून केंद्र सरकारच्या मदतीने ईडीचा गैरवापर केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने घडत आहे, असं म्हणत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावरून भाजपवर शरसंधान साधले. ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होणे याचे त्यांना अधिकार असतील तर त्यांनी कारवाई करावी परंतु ज्या पद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत आणि कारवाई होत आहे, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- ‘ठाकरे सरकारचे नियम आमदार-खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?’ निलेश राणेंचा सवाल
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- ‘हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार…’; दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधवांना अटक
- ‘राजसाहेबांचा आदेश…हिंदू सण साजरे होणारच, यंदाची दहीहंडी दणक्यात करा’

