Share

‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : श्रावणासारख्या पवित्र महिन्यात मंदिर बंद ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. तेच पाप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करत आहे. श्रावण महिन्यात देव बंदिस्त ठेवणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करत, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. माधुरी अदवंत यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे भाजपने राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अॅड. अदवंत म्हणाल्या की, ‘मागच्या वर्षी देखील आम्ही आंदोलन करुन मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. मात्र, या आघाडी सरकारने तेव्हा देखील आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. तसेच दुर्लक्ष आताही करण्यात येत आहे. इतर राज्यात मंदिरे सुरू आहेत. त्या ठिकाणी मंदिरामुळे कोरोना वाढला असल्याचे कोणतेच उदाहरण नाही. त्यामुळे नागरिक स्वत:च मंदिरात जातांना काळजी घेतील.’

मंदिरे खुली झाली तर मंदिर व्यवस्थापन समितीचं कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करेल. मात्र, ठाकरे सरकारचा हिंदू द्वेष्टेपणा यातून दिसून येत आहे. त्यामुळे हिंदूत्त्वाचा बेगडीपणा दाखवणे सरकारने बंद करावे. एकिकडे आम्ही हा निर्णय नागरिकांसाठी घेत असल्याचे दाखवले जात आहे. मात्र, सरकारचे हे पुतना मावशीचे प्रेम असल्याचेही अॅड. अदवंत म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!