🕒 1 min read
रत्नागिरी : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. भाजपकडून आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
भाजपच्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा फोटो शेअर करत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हेच धार्मिक स्थळ बंद ठेवण्याच्या आदेशाला हरताळ फासत एका मंदिरात धार्मिक विधी करताना दिसत आहेत. त्यामुळे आमदार-खासदारांच्या मुलांना नियम लागू होत नाहीत का ? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
हे शिवसेना आमदार भास्कर जाधवचं पोर.. इतरांसाठी मंदिर बंद असताना हा बिनकामाचा रत्नागिरी ZP अध्यक्ष विक्रांत जाधव मंदिर स्वतःसाठी उघडून बसलाय. ठाकरे सरकारचे नियम आमदार खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?? ठाकरे सरकार कडून प्रत्येक गोष्टीत उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. pic.twitter.com/oAo8eHJTh7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 30, 2021
‘हे शिवसेना आमदार भास्कर जाधवचं पोर.. इतरांसाठी मंदिर बंद असताना हा बिनकामाचा रत्नागिरी ZP अध्यक्ष विक्रांत जाधव मंदिर स्वतःसाठी उघडून बसलाय. ठाकरे सरकारचे नियम आमदार खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?? ठाकरे सरकार कडून प्रत्येक गोष्टीत उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे’, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- टीव्ही अँकरच्या मागे बंदूका रोखत तालिबान्यांनी करायला लावली स्तुती; व्हिडिओ व्हायरल
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- ‘हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार…’; दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधवांना अटक
- ‘या’ भाजप आमदाराने ५०० कोटींचा घोटाळा केला; ईडीच्या कारवाईनंतर खा.भावना गवळींचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
