🕒 1 min read
सांगली : बैलगाडा शर्यतीवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी झरे या ठिकाणी जाणाऱ्या बैलगाडा मालकांना अडवण्यासाठी प्रशासनाने आपली पूर्ण ताकद लावली आहे. ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिलेत. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ ट्विट करत शेतकऱ्यांना शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘एक लढा अस्तित्वासाठी, एक लढा अस्मितेसाठी, शेतकऱ्यांचा प्राण असणाऱ्या सर्जा, राजा, पर्शा, लक्ष्यासाठी! भव्य छकडा गाडी शर्यतीसाठी यायलाच लागतंय’ या शब्दांत पडळकर यांनी ट्विट केले आहे. सोबतच बैलगाडी हाकतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
https://twitter.com/GopichandP_MLC/status/1427859733138984966
दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला. त्यानंतर पोलिसांकडून जिल्ह्याच्या सगळ्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. ‘जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारचंट, असे म्हणत गोपिचंद पडळकरांनी पोलिसांना आव्हान केले आहेत. पोलिसांची कारवाई सुरू असताना पडळकरांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस आणि पडळकरांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली.
‘जेलमध्ये टाकलं तरीही बैलगाडा शर्यत होणारच. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. आम्ही बैलगाडा शर्यत भरवणारचं’, असा आक्रमक पवित्रा पडळकरांनी घेत महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीचे गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे, अशी टीका देखील पडळकरांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
