🕒 1 min read
मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स व अन्य आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनलॉकचं हे मोठं पाऊल उचलत असताना धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आला नाही. राज्यातील धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
यावरून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर टीकास्त्र सुरू केले आहे. त्याचबरोबर भाजपचे नेते नितेश राणे यांनीही मंदिर बंदच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण.. हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे.. हिंदू हो.. तो डर के रहो.. ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र!!’ या शब्दांत नितेश राणेंनी हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!!
कारण..
हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे..
हिंदू हो..
तो डर के रहो..
ये है उद्धव का "नया" महाराष्ट्र !!— Nitesh Rane (@NiteshNRane) August 18, 2021
मंदिरांपेक्षा दारूच्या दुकानात गर्दी!;
तर पंढरपूर येथे मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरे बंद ठेवण्यामागचं कारणंच लक्षात येत नाही, असे नमूद करताना मॉल, दारूची दुकाने आणि बारमध्ये मंदिरांपेक्षा जास्त गर्दी होते तरीही दारूची दुकाने सुरू आणि मंदिरे बंद का?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला. ‘जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरात असते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे?, असे विचारताना याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
