🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतील चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्मिथने अखेर कर्णधार पद सोडलं आहे. संघाचा कर्णधार म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत स्मिथने कर्णधारपद सोडलं आहे. डेविड वॉर्नरनेही आपल्या उप कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.
BREAKING: Steve Smith and David Warner have stood down as captain and vice-captain for the remainder of this Test. More to come #SAvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 25, 2018
काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.
स्मिथची कबुली –
चेंडूशी छेडछाड करून आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा आमचा प्रयत्न होता, संपूर्ण संघाला याबाबत माहिती होती, असं स्मिथने मान्य केलं. ही जबाबदारी कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर सोपावण्यात आली होती असंही तो म्हणाला. तीस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट पत्रकार परिषदेत आले. जे काही झालं ते टीव्ही कॅमे-यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. हा महत्वाचा सामना होता. पण चेंडूपासून कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून सामन्यात पुनरागमन करता यावं यासाठी संघातील काही खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली स्मिथने दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं. पण थोड्यावेळातच ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला. त्यानंतर काही वेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे.
पहा व्हिडीओ
https://twitter.com/CChroniclesHub/status/977597859771179008
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
