🕒 1 min read
मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दर, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.
काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी विषम स्थिती निर्माण झाली असून दोन्ही भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर हा कमी झाला आहे. परंतु आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रीय झाला आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आजही कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन-तीन दिवसात राज्यात मान्सून सुरळीत होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी राज्यात हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. आज महाराष्ट्रात मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा गडगडाट अधिक असणार आहे. परिणामी विजा कोसळण्याचा धोका आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत अकरावी प्रवेशासाठी यंदा ‘ऑफलाईन’च एकमेव ऑप्शन!
- सिल्लोड शहरासह संपूर्ण मतदारसंघ प्रकाशमान करु- अब्दुल समीर
- भवानीच्या दरबारात मातेवर अन्याय! मुलीचा मृत्यू, डॉक्टर मोकाट; संयमाची ‘प्रतीक्षा’ संपल्याने आत्महदनाचा प्रयत्न
- ‘…तर पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो’; जयंत पाटलांनी दिले सतर्क राहण्याचे आदेश
- शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला, खासगी शाळांकडून केराची टोपली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
