🕒 1 min read
मुंबई : पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणातील काही ऑडिओ व फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
आता संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. मात्र, त्याकाळी राठोड हे मंत्रीपदी असल्याने कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये
त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय pic.twitter.com/4ZFQU6NGHt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 12, 2021
याबाबत त्यांनी एक ट्विट करत महिलेने केलेल्या तक्रारीची प्रत देखील शेअर केली आहे. ‘शिवसेना आमदार माजी मंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय,’ अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून चौकशी व तपासानंतर हे आरोप कितपत खरे हे सिद्ध होऊ शकेल.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
