नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास आठशे कोटींचा महाघोटाळा झाला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी केली आहे. त्याकरिता केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून नवनीत राणा यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यात मेळघाटात ४९ नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.
उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले. राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यांच्याच गृह जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही गोष्ट अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी आहे.
कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी आहेत. तसेच या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी ५० टक्के रकमेचा निधी समाविष्ट असतो. त्यामुळे एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी राणा यांनी यावेळी केली.
मेळघाटातील अशिक्षित आदिवासी महिलांची फसवणूक झाली आहे. एक महिला पालकमंत्री व महिला बालविकास कॅबिनेट मंत्र्यांच्या विभागात व गृह जिल्ह्यात होऊनही स्वतः महिला असणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची साधी दखलही न घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी देणे होय किंवा यांचा त्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी यावेळी स्मृती इराणी यांच्याकडे केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंदिरांवर निर्बंध लादून आघाडी सरकारने आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणे घेणे नसल्याचेच दाखवून दिले आहे’
- शेतकऱ्यांचे महाबीज शासनाने सोडलं वाऱ्यावर; शेतकऱ्यांसोबत अनिल बोंडे करणार ठिय्या आंदोलन
- रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार; राजकारण होत असेल तर हाणून पाडू – उदय सामंत
- ‘दिल्लीत जाऊन आंदोलनाचे ढोंग करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अत्याचारांच्या घटनांवर बोला’
- काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली : नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
