Share

रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार; राजकारण होत असेल तर हाणून पाडू – उदय सामंत

Published On: 

नांदेड : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर असलेलं रानडे इन्स्टिट्यूट संज्ञापन व वृत्तपत्र विभागासाठी (पत्रकारिता विभाग) देशभरात प्रसिद्ध आहे. 60 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेला आणि या क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखला जाणारा विभाग आहे. परदेशातील अनेक विद्यार्थी येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत असतात. देशभरातील अनेक माध्यमांमध्ये येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. अशा नावाजलेल्या रानडे इन्स्टिट्यूट या विभागाचे स्थलांतर करण्यास विभागातील माजी, आजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने, कुलगुरूंनी कुठलीही जाहीर पूर्वसूचना न देता, कोणालाही विश्वासात न घेता राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतला आहे. या जागेची मार्केट किंमत 400 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे या जागेवर अनेकांचा डोळा आहे. या स्थलांतराचा फटका आर्थिकदृष्ट्या गरीब, वंचित विद्यार्थ्यांना बसणार आहे. रानडे इन्स्टिट्यूट हे शासन अनुदानित विभाग आहे. कमी पैश्यांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण येथे मिळते. जर ते विद्यापीठात हलवले तर त्याचा फटका सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना बसेल कारण, विद्यापीठात तो विभाग विना अनुदानित असेल.

याबाबत आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं असून जर कोणतंही राजकारण होत असेल तर ते हाणून पाडू असं विधान केलं आहे. ‘पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटला एक इतिहास आहे. इन्स्टिट्यूट हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. अनेक संघटनांनी ही हा प्रश्न उचलला आहे. त्यामुळे मी ही 14 तारखेला रानडेला इन्स्टिट्यूट भेट देणार आहे. स्थलांतरावरुन तिथे काही राजकारण होत असेल तर आपण तो हाणून पाडू ,’ अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी नांदेड दौऱ्यात माध्यमांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!