Share

शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; फडणवीसांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने ग्रामीण भागातील पाचवी असूनचे पुढील वर्ग तर शहरी भागातील ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास १७ ऑगस्ट पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील घोषणा केली होती. सध्या कोरोनाची लाट ही ओसरली असून निर्बंध देखील शिथिल केले जात आहेत.

मात्र अद्यापही संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या निर्णयाचा गोंधळ हा समोर आला आहे. शाळा सुरु करण्याबाबतच्या जीआरला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्स सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या संभ्रमतेत अधिक वाढ झाली आहे.

शाळा सुरू करण्याबाबत टॉस्क फोर्स, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच शाळा सुरू करण्यावर सरकारचे एकमत होत नसल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!