Share

‘स्पष्ट बोलता न आल्याने मित्र चिडवायचे’; शरद केळकरने सांगितला अनुभव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता शरद केळकर हा सिनेसृष्टीतला सर्वात उत्कृष्ट अभिनेता. सगळ्याच भूमिकांमधून तो आपली एक वेगळी छाप निर्माण करतो. आपण त्याला अनेक भूमिकांमध्ये काम केलेले पाहायले आहे. त्याच्या अभिनयाने त्याने अनेकाच्या मनात जागा निर्माण केली आहे. मात्र हे यश मिळविण्यासाठी अथक मेहनत करून अभिनेता शरद केळकरने सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. शरद केळकरने त्याचे काही अनुभव एका मुलाखतीत सांगितले आहे.

मनीषच्या चॅट शोमध्ये शरदने त्याच्या बालपणी बोलताना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. शरदने सांगितले की त्याला आई म्हणताना देखील त्रास होत असे. तो अडखळत बोलत असल्याने त्याच्या शाळेतील अनेक मुलं त्याला चिडवत होती. शरदने सांगितले, ‘बोलताना अडखळल्यामुळे मला माझे मित्र चिडवत होते. हा त्रास अनेक लहान मुलांना किंवा मोठ्यांना असू शकतो. पण याला घाबरून जाऊ नका. प्रत्येक गोष्ट नीट केले जाऊ शकते,’ असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शरद केळकरची ‘लक्ष्मी’ चित्रपटातील तृतियपंथीयाची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याच्या कामाच कौतुकही झाले. या मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या जोरोवर अनेकांच्या मनात जागा केली आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने शरद आधिक लोकप्रिय झाला आहे. शरद  ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटासह ‘जर्सी’, ‘देजा वू’, ‘भूज’ या हिंदी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!