Share

‘विरोधकांनी देशाची माफी मागावी’, केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: संसदेत झालेल्या गदारोळाची चर्चा आज दिवसभर रंगली. संसदेत मार्शल रक्षकांकडून महिला खासदारांना मारहाण करण्यात आली. अशी घटना संसदेत पहिल्यांदाच घडली. असा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला.दरम्यान पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गदारोळातच सुरु झाला.या आरोपानंतर विरोधकांनी सरकारविरोधात धरणे आंदोलन पुकारले. यावेळी राहुल गांधीसह एकूण १५ पक्षांचे नेते आंदोलनात उपस्थित होते. तर दुसरीकडे ८ केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, व्ही मुरलीधरन, अनुराग ठाकुर आणि प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली.

अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, विरोधकांना जनतेचं हित किंवा करदात्यांचा पैसा किंवा संविधानाच्या मूल्यांची कोणतीच चिंता नव्हती. जे घडलं ते खूपच लज्जास्पद होते. त्यामुळे विरोधकांनी देशाची माफी मागायला हवी. विरोधकांचे वागणे हे लाज आणणारे आणि गोंधळ माजवणारे होते असे अनुराग ठाकूर यांनी परिषदेत म्हटले आहे.

तर यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘आम्ही दररोज चर्चेसाठी प्रयत्न केला होता. चर्चा व्हावी असाच आमचा प्रयत्न होता. पहिल्याच दिवशी जेव्हा मंत्र्यांची ओळख करून द्यायची तेही राहून गेले. विरोधकांनी यामध्ये अडथळा आणला.आम्ही चर्चेसाठी तयार होतो. मात्र विरोधकांनी चर्चेतून पळ काढला असल्याचा आरोप प्रल्हाद जोशीयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!