Share

‘शाळांच्या फी कपातीला विरोध करणारे मंत्री कोण हे मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे अन्यथा आम्ही…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुप्रीम कोर्टाने राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शाळेतील १५ टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोरोना काळात केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याचे निर्देश दिले होते. त्या आधारावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील फी कपातीचे संकेत दिले होते.

दोन आठवड्यांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत फी कपातीच्या निर्णयाला मंजुरी देखील देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अधिसूचनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अध्यादेश काढण्यावरून काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे आरोप करत राज्य सरकारचाच फी कपात करण्यास विरोध असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

याबाबत आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. फी कपातीच्या चांगल्या आणि पालकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या निर्णयाला विरोध करणारे मंत्री कोण हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं अन्यथा आम्ही ते बिंग फोडू, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. ‘फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे अन्यथा आम्ही हे बिंग फोडू…’ असं म्हणत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!