🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आधी मंत्र्यांनी जाहिर केलेले अनेक निर्णय नंतर राज्य सरकारने रद्द केले आहे. आता १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे. यावरुन भाजपच्या वतीने राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. या संदर्भात सरकार आहे की, सर्कस ? असा प्रश्न उपस्थित करुन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून दरेकर यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. ते म्हणाल की, ‘१५% शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला! काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना! एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल!’
'सरकार' आहे की, 'सर्कस'?
15% शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला!
काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला?
जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना!
एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल! @CMOMaharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 12, 2021
लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद होत्या. काही प्रमाणात ऑनलाईन शिक्षण झाले असले तरी शाळांनी फीमध्ये सवलत देण्याची मागणी पालकांनी केली होती. तसे आवाहन सरकारच्या वतीनेही करण्यात आले होते. मात्र, तरी देखील शाळांनी फी कपात केलेली नाही. अखेर राज्य सरकार असा अध्यादेश काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता मंत्रिमंडळ बैठकीत असा अध्यादेश काढण्यास नकार देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंदिरांवर निर्बंध लादून आघाडी सरकारने आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणे घेणे नसल्याचेच दाखवून दिले आहे’
- शेतकऱ्यांचे महाबीज शासनाने सोडलं वाऱ्यावर; शेतकऱ्यांसोबत अनिल बोंडे करणार ठिय्या आंदोलन
- खा. संभाजी राजेंना बोलण्याची संधी नाकारण्याचा प्रयत्न दुर्दैवी – अशोक चव्हाण
- ‘दिल्लीत जाऊन आंदोलनाचे ढोंग करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अत्याचारांच्या घटनांवर बोला’
- काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली : नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

